Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

आरटीईअंतर्गत प्रलंबित शुल्क खासगी शाळांना त्वरित द्या

उमेश बांबरे

सातारा : राज्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना (Private English medium school) 25 टक्के राखीव जागांची ठरवून दिलेल्या शुल्काची रक्कम आरटीई (RTE) अंतर्गत त्वरित वितरीत करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांना समक्ष भेटून केली आहे. यावेळी या मागणीचे निवेदनही दिले आहे. (MP Udayanraje Bhosale Met On Minister Varsha Gaikwad Regarding Private English Medium School)

गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या संबंधित अनेक विधायक निर्णय घेवून शिक्षण खात्याने कोरोना लढाईतील वाटा उचलला आहे. त्याबद्दल शिक्षण मंत्रालय कौतुकास पात्र आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या सुमारे दीड वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमध्ये (coronavirus) शालेय विद्यार्थ्यांच्या संबंधित अनेक विधायक निर्णय घेवून शिक्षण खात्याने कोरोना लढाईतील वाटा उचलला आहे. त्याबद्दल शिक्षण मंत्रालय (ministry of education maharashtra) कौतुकास पात्र आहे. मात्र, राज्यातील खाजगी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी संख्येच्या 25 टक्के संख्या एससी, एसटी, आर्थिकदृष्ट्या मागास आदींसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या 25 टक्के विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क प्रत्येक शाळेच्या गुणात्मक निकष मुल्यांकनाव्दारे शासन प्रत्येक शाळेला प्रदान करीत असते. आजपर्यंत 2018 पर्यंत असे आरटीईचे शुल्क राज्य शासनाने संबंधित शाळांना प्रदान केलेले आहे. त्यानंतर मात्र आजअखेर जवळजवळ तीन वर्षे हे शुल्क वितरीत केलेले नाही.

कोरोनामुळे खाजगी इंग्रजी शाळा चालक आणि पालक या दोघांची शिक्षण देणे आणि शिक्षण घेणे या याविषयी परवड सुरु आहे. शाळांनी 50 टक्के फी सवलत दिली पाहिजे, अशी पालकांची मागणी आहे. विविध पालक संघ याबाबत आक्रमक होत आहेत. तर संस्थाचालकांना संस्थेचे कर्ज, गुरुजनांसह अन्य व्यक्तींचे पगार भागवणे हे मुलभुत खर्च टाळता आलेले नाही. त्यामुळे पुन्हा 50 टक्के फी सवलत देणे जिकिरीचे बनले आहे. या पार्श्‍वभूमीवर, सरकारकडे प्रलंबित असलेल्या आरटीईची थकित रक्कम इंग्रजी शाळांना वितरीत करावी. त्यामुळे संस्थाचालक काही प्रमाणात चालू शैक्षणिक वर्षामध्ये फीमध्ये सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेवू शकतील. त्यामुळे ही प्रलंबित रक्कम तातडीने मिळावी. यावेळी रॉबर्ट मोझेस, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर,विनीत पाटील आदी उपस्थित होते.

MP Udayanraje Bhosale Met On Minister Varsha Gaikwad Regarding Private English Medium School

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT