MPSC sakal media
महाराष्ट्र बातम्या

MPSC : २०१९ चा अंतिम निकाल जाहीर; प्रथम क्रमांकावर 'या' विद्यार्थ्यांची बाजी

संजीव भागवत

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्यात 13 ते 15 जुलै,2019 या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९ या परीक्षेचा निकाल (Main exam result) आज जाहीर करण्यात आला आहे. यात सर्वसाधारण वर्गवारीमधून प्रसाद चौगुले (prasad chaugule), मागास प्रवर्गातून रोहन कुवर (rohan kuwar) आणि महिला वर्गवारीतून मानसी पाटील (manasi patil) राज्यात प्रथम आल्या आहेत.

परीक्षेच्या एकूण ४२० पदांचा सुधारित अंतिम निकाल लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून हा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. सोबत उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाने निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली.

या निकालानंतर अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईल मध्ये पाठविल्याच्या तारखेपासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करता येणार आहे. आयोगाकडून हा निकाल जाहीर करताना भरतीप्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षीत असलेली पदे अराखीव (खुल्या) पदांमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या तसेच दीव्यांग आणि अनाथ आदी आरक्षणासाठी असलेल्या न्यायालयाच्या, प्राधिकरणाच्या विविध निर्णयांचा अवलंब करण्यात आला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT