MPSC MPSC
महाराष्ट्र बातम्या

MPSC : कागदपत्रे सादर करण्यासाठी वेब लिंक, शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ

सकाळ डिजिटल टीम

जा. क्र. 059/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० साठी उपस्थित असलेल्या खेळाडू उमेदवारांनी त्यांची क्रीडा विषयक कागदपत्रे सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. कागदपत्रे सादर करण्याची अंतिम दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ आहे.

तसेच जाहिरात क्रमांक ००१/२०२२ सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ साठी दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टीमुळे चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवारांना चलनाची प्रत घेण्यास व परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

क्रीडा विषयक कागदपत्रे सादर करण्यासाठी

२ सप्टेंबर २०२१ रोजी सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२० या परीक्षेस उपस्थित खेळाडू आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांकडून त्यांच्या दाव्याच्या पृष्ठ्यर्थ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल/पोचपावती यांच्या प्रती यापूर्वी पूर्व परीक्षेच्या निकाल प्रक्रियेदरम्यान मागविण्यात आल्या होत्या. सदर क्रीडाविषयक प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला आहे.

खेळाडू आरक्षणाचा दावा केलेल्या व मुख्य परीक्षेस उपस्थित असणाऱ्या उमेदवारांच्या क्रीडा विषयक प्रमाणपत्रांची तपासणी सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत शिफारशीपूर्वी करण्यात येणार आहे. सदर मुख्य परीक्षेसाठी खेळाडू आरक्षणाचा दावा केलेल्या व परीक्षेस उपस्थित असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या दाव्याच्या पृष्ठ्यर्थ कागदपत्रे/प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या सदराखालील ‘Upload Documents’ या लिंकद्वारे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.

चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा

७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय स्टेट बँकेसह सर्व सरकारी बँका कार्यालये बंद असल्याच्या कारणास्तव अर्ज करणाऱ्या उमेदवारांना चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करणे शक्य झाले नाही. तसेच विहित दिनांकानंतर चलनाची वैधता समाप्त होत असल्याने दिनांक ७ फेब्रुवारीनंतर उमेदवारांना चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करता आला नाही. विहित कालावधीत अर्ज सादर केलेल्या तथापि परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवारांना परीक्षाशुल्काचा भरणा करण्यासाठी चलनाची प्रत प्राप्त करण्यास व बँकेमध्ये परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे

  • चलनाची प्रत प्राप्त करण्याची अंतिम दिनांक - १० फेब्रुवारी

  • चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा अंतिम दिनांक - ११ फेब्रुवारी

  • यापूर्वी चलनाची प्रत प्राप्त करून घेतली आहे. परंतु, चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा केला नाही अशा उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे चलनाची प्रत पुन्हा प्राप्त करून घेऊन त्याद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT