3MPSC_10.jpg 
महाराष्ट्र बातम्या

'एमपीएससी'तर्फे उमेदवारांना अपात्रतेचा इशारा ! पेपरपूर्वी दीड तास अगोदर परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार 

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवेची पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी होणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र काढण्याचे आवाहन केले आहे. तर अडचणीसंदर्भात 1800-1234-275 आणि 1800-2673-889 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आयोगाकडे परीक्षेसंदर्भात चौकशी करताना काही उमेदवार उध्दट बोलत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या क्रमाकांवरील कॉल रेकॉर्डिंग केले जाणार असून संबंधित उमेदवाराला अपात्र ठरविण्याचा इशारा आयोगाने दिला आहे.

आयोगाच्या सूचना अन्‌ इशारा... 

  • मूळ प्रवेशपत्राविना उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश मिळणा नाही 
  • परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उमेदवारांची उपस्थिती बंधनकारक 
  • परीक्षा केंद्रावर उशिराने आलेल्या उमेदवाराला परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही 
  • ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड आवश्‍यक 
  • परीक्षा कक्षात मोबाइल घेऊन जाता येणार नाही; मित्र, नातेवाईकांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश नाही 
  • परीक्षा कालावधीत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार 
  • उमेदवारांनी आयोगाच्या टोल फ्री क्रमांकावर परीक्षसेसंबंधीच्या अडचणीच विचाराव्यात 
  • मदत केंद्रावरील दूरध्वनी संभाषणाचे ध्वनीमुद्रण केले जात असून अनावश्‍यक माहिती विचारणाऱ्यावर तथा उध्दट बोलणाऱ्यांवर होईल अपात्रतेची कारवाई 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. परंतु, केंद्रीय व राज्य, विद्यापीठांच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून सवलत दिली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे स्वत:चे ओळखपत्र व परीक्षेचे प्रवेशपत्र ठेवावे, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे. परीक्षेच्या अनुषंगाने आयोगाच्या सचिवांनी तथा राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना त्यादृष्टीने निर्देश दिले आहेत. पेपर सुरु होण्यापूर्वी उमेदवारांनी दीड तास अगोदर परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले असून पेपरसाठी उशीर करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे. सर्व परीक्षार्थींना कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळावे लागतील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT