MPSC Sakal
महाराष्ट्र बातम्या

डिसेंबरच्या परीक्षांची जाहिराती जानेवारीत, MPSCने दिली महत्त्वाची माहिती

पीएसआयसह इतर परीक्षा देणाऱ्यांसाठी एमपीएससीने दिली महत्त्वाची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा २०२१ आणि पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) मर्यादित विभागीय परीक्षा २०२१ साठी डिसेंबर २०२१ मध्ये जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नाहीत. याबाबत आज रविवारी (ता.दोन) एमपीएससीने ट्विट करुन माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, की महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा २०२१ व पोलिस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१ साठी डिसेंबर २०२१ मध्ये प्रस्तावित असलेल्या जाहिराती काही तांत्रिक बाबींच्या पूर्ततेअभावी अद्याप प्रसिद्ध करणे शक्य झाले नाही. सदर तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील, असे लोकसेवा आयोगातर्फे कळविण्यात आले आहे. (MPSC Will Publish PSi And Other Exams Advertisement In January)

मात्र तांत्रिक कारण कोणते हे आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले नाही. सध्या राज्यात परीक्षांचा गोंधळ सुरु आहे. यात परीक्षार्थी विनाकारण भरडला जात आहे. तसेच त्याच्या मानसिक आरोग्य काय परिणाम होत असेल याचा शासनाने विचार करायला हवा. परीक्षेसाठी अनेक महिन्यांपासून तरुण-तरुणी दिवस रात्र मेहनत करतात.

मात्र असे अचानक काही बदल झाल्यावर त्यांच्या अभ्यासावर ही परिणाम होतो. आता एमपीएससीने दिलेले वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT