Nidhi Choudhari
Nidhi Choudhari 
महाराष्ट्र

गांधींवर वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निधी चौधरी आहेत तरी कोण?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या मुंबई महापालिकेतील उपायुक्त निधी चौधरी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ही मागणी केली आहे.

निधी यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने भारतीय चलनात असणाऱ्या नोटांवरील गांधीजी यांचे छायाचित्र काढून टाकावे व जगभरातून त्यांचे पुतळे हटवून त्यांना श्रद्धांजली द्यावी, असे विधान सोशल मीडियावर केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

निधी चौधरी आहेत तरी कोण? 
- निधी चौधरी या 2012 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी 
- मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत
- यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले 
- आएएस अधिकारी होण्यापूर्वी 2008 मध्ये रिझर्व्ह बँकेतही काम
- मूळच्या राजस्थानमधल्या नागौर जिल्ह्यातल्या डीडवानाच्या रहीवाशी
- जयपूरमध्ये त्यांचे उच्च शिक्षण झाले.
- राजस्थान विद्यापीठातून त्यांनी लोकप्रशासन या विषयात पी. एचडी संपादन केली
- एप्रिल 2017 मध्ये त्या चर्चेत आल्या
- पालघर जिल्हा परिषदेच्या सीईओ असताना एका आंदोलनादरम्यान आंदोलकांनी गैरवर्तन केल्याचा आरोप
- माजी आमदारासह 17 जणांना अटक करण्यात आली होती.
- त्यावेळीही निधी यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना मांडल्या
- निधी यांच्या मते अनेक वर्षांपासून त्यांच्या व्हॉटसअपचा स्टेटस सत्यमेव जयते आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेची उमेदवारी

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT