eknath shinde and raj thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंची सभा अन् मुख्यमंत्री शिंदेंची मनसे कार्यालयाला भेट; राजू पाटील म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडवा सभा आहे. या सभेकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र संध्याकाळी सभा असतांना सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्यानिमित्त सभा आहे. या सभेत ते सध्याचं घसरलेलं राजकारण, सत्तासंघर्ष आणि मशिदीवरील भोंगे या मुद्द्यांवर बोलतील, असं सांगण्यात येतंय. सायंकाळच्या या सभेकडे राज्याचसह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

सायंकाळी राज यांची एकीकडे सभा असतांना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या कार्यालयाला भेट दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिल दिली. या भेटीमागचं नेमकं कारण समजू शकलेलं नसलं तरी शिवसेना-मनसे यांच्यातील युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

यासंदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितलं की, युती किंवा इतर बाबतींमध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे हेच काय ते ठरवतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणपती संस्थानच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी मी त्यांना मनसेच्या कार्यालयात येण्याचं आमंत्रण दिलं. त्यांनीही मोठ्या मनाने मनसे कार्यालयाला भेट दिल्याचं पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, राज ठाकरे यांची शिवतीर्थावर आज जंगी सभा होणार आहे. राज यांचा ठाकरी बाणा, शालजोडे आणि ताशेरे; याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भविष्यात मुंबई महानगर पालिकेच्या निमित्ताने राज ठाकरे काय भाष्य करतात, हेही पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT