Custody Of Children Esakal
महाराष्ट्र बातम्या

Custody Of Children: "त्यांना आईची गरज", मुलांना वडिलांकडे रहायचंय पण हायकोर्टाने का सोपवला आईकडे ताबा?

Custody Of Children Mumbai High Court case: हे लक्षात घेतले पाहिजे, की सध्या मुले वडिलांच्या ताब्यात आहे आणि अपेक्षेप्रमाणे वडिलांच्या सोबत राहण्यास इच्छा दर्शविली आहे.

आशुतोष मसगौंडे

अल्पवयीन मुलांच्या ताब्यासंदर्भात निर्णय घेताना पालकांपैकी केवळ एका पालकाकडे राहण्याची मुलाची इच्छा हा एकमेव निकष असू शकत नाही. मुलांना आईच्या लक्ष व काळजीची गरज आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी अल्पवयीन मुलांचा ताबा आईकडे सोपविण्याचे आदेश दिले.

अल्पवयीन मुलांचा ताबा पतीकडून काढून आपल्याकडे द्यावा, अशी विनंती मुलांच्या आईने कौटुंबिक न्यायालयाकडे केली होती. कौटुंबिक न्यायालयाने वय दोन आणि पाच वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना न्यायालयीन आदेशाद्वारे आईच्या ताब्यात दिले.

या आदेशाविरोधात मुलांच्या वडिलांनी खंडपीठात अपील दाखल केले. वडिलांमार्फत असा युक्तिवाद करण्यात आला की, मुलांना त्यांच्या वडिलांसोबत राहण्याची इच्छा आहे व वडील मुलांचा सांभाळ करण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. मात्र, सुनावणीनंतर खंडपीठाने मुलांच्या वडिलांची याचिका फेटाळून लावली. अल्पवयीन मुलांच्या आईतर्फे सय्यद तौसिफ यासीन यांनी बाजू मांडली.

न्यायालयाचे निरीक्षण

खंडपीठाने याचिका फेटाळताना विविध निवाड्यांआधारे असे निरीक्षण नोंदवले की, अल्पवयीन मुलांच्या ताब्यासंदर्भात निर्णय घेताना पालकांपैकी केवळ एका पालकाकडे राहण्याची मुलाची इच्छा हा एकमेव निकष असू शकत नाही किंवा त्या आधारावर निर्णय घेता येणार नाही. लहान वयातील मुलाला त्याच्या हिताची व कल्याणाची पूर्ण जाणीव नसते. ज्या पालकांसोबत ते राहतात, त्यांच्यासोबत राहण्याची प्रवृत्ती नेहमीच असते.

मुले मुख्यतः पालकांच्या शिकविण्यामुळे प्रभावित होतात 'सध्याच्या प्रकरणातही न्यायालयाने मुलांशी संवाद साधला असता, त्यांनी साहजिकच आपल्या वडिलांसोबत राहण्याची इच्छा वर्तविली. तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे, की सध्या मुले वडिलांच्या ताब्यात आहे आणि अपेक्षेप्रमाणे वडिलांच्या सोबत राहण्यास इच्छा दर्शविली आहे. न्यायालयाने वडिलांची याचिका फेटाळून लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच अन् राष्ट्रवादी अजितदादांची! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर CM फडणवीसांचे भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT