mumbai-high-court 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील शेकडो मराठा विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा दिलासा; तीन वर्षांपासून रखडलेल्या पदभरतीचा मार्ग मोकळा

‘मॅट’चा निकाल रद्द करतानाच या निर्णयाला स्थगिती देण्यास खंडपीठाने नकार दिला, तसेच चार आठवड्यांत या नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मराठा समाजातील उमेदवार आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकत नाहीत, असा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जामदार व न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने आज रद्द केला.

‘मॅट’चा निकाल रद्द करतानाच या निर्णयाला स्थगिती देण्यास खंडपीठाने नकार दिला, तसेच चार आठवड्यांत या नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लोकसेवा आयोग, वनविभाग, कर सहाय्यक, पोलिस उपनिरीक्षक, अभियंता व इतर पदांसाठी गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाल्याने शेकडो मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने २०१८ मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) कायदा केला. या कायद्याअंतर्गत राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मंजूर केले; मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा घटनाबाह्य ठरवत रद्द केला. राज्य सरकारने २०१९ मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली.

या जाहिरातीत ‘एसईबीसी’अंतर्गत मराठा उमेदवारांसाठी आरक्षण ठेवण्यात आले होते; मात्र सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी कायदा रद्द केल्याने या अंतर्गत मूळ अर्ज केलेल्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस कोट्यांतर्गत अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली. सरकारने तसा अध्यादेशही जारी केला; मात्र ईडब्ल्यूएस श्रेणीअंतर्गत आधीच अर्ज केलेल्या बिगर मराठा उमेदवारांनी या अध्यादेशाला ‘मॅट’मध्ये आव्हान देत नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली.

मॅटने ज्या उमेदवारांनी एसईबीसी अंतर्गत अर्ज केले होते, ते ईडब्लूएस अंतर्गत सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकत नाही, असे स्पष्ट करत त्यांना अपात्र ठरवले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये मॅटच्या या निकालाला शेकडो मराठा उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज न्यायाधीश नितीन जामदार व न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. (Latest Marathi News)

न्यायालय काय म्हणाले?-

- मराठा समाजाला सरकारी नोकरभरतीत परवानगी देऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.
- मॅटने राज्याची ही कृती मनमानीकारक आहे, असा कोणताही विशिष्ट निष्कर्ष आपल्या आदेशात नमूद केलेला नाही.
- निकालानुसार मराठा समाजाच्या उमेदवारांनी जास्त गुण मिळवले, याचा अर्थ असा होतो, की ते कधीही एसईबीसी आरक्षणासाठी पात्र नव्हते.
- मॅटचा निकाल प्रस्थापित कायदेशीर तत्वांपासून विचलित झाला आहे व तो चुकीचा आहे. या आदेशाचा उमेदवारांवर नकारात्मक परिणाम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Killing Case : कोल्हापूरच्या शाहूवाडीतील पती, पत्नीचा खून करणारा निघाला ‘सीरियल किलर’; 'द व्हिलन' मुव्हीपेक्षाही भयानक प्रकरण

BSc Nursing Colleges: पायाभूत सुविधाच नाही, विद्यार्थी शिकणार कसे?; राज्यातील बीएससी नर्सिंग कॉलेजेसवर; प्राचार्य, उपप्राचार्यांची सक्तीने नियुक्ती

Latest Marathi News Live Update : सरकारकडे सर्व माहिती कर्जमाफीची वाट कसली पाहताय : उद्धव ठाकरे

Matheran Mini Train: ‘माथेरानची राणी’ पुन्हा धावणार! मार्ग दुरुस्ती, सुरक्षा तपासणी पूर्ण; पर्यटकांना दिलासा

Pune Traffic : महापालिकेची पथके उतरली रस्त्यावर, खड्डेमुक्त पुणे अभियान सुरू; खराब रस्त्यांची दुरुस्ती करणार

SCROLL FOR NEXT