महाराष्ट्र

कृषी अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा करणार  - सुभाष देशमुख

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव, तसेच शासकीय योजनांचे लाभ थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण माहितीचा मास्टर डाटाबेस पणन विभागामार्फत तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पात अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या माहितीचा तपशील कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑनलाइन पद्धतीने नोंदवावा, असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.

ते म्हणाले, की शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कृषीविषयक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, शेतमालाचा बाजारातील अद्ययावत भाव, प्रमाण या विषयीची माहिती, तसेच शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, लागवडीखालील क्षेत्र, आधार क्रमांक, बॅंक खात्याचा तपशील, संपर्क क्रमांक आदी माहितीचे संकलन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्तरावर करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून कापूस पणन महासंघाकडे पूर्वीपासूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीच्या तपशिलात भर घातली जाणार आहे. प्राथमिक स्तरावर हा प्रकल्प किमान आधारभूत योजनेंतर्गत कापूस खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे राबविण्यात येणार असून कालांतराने इतर शेतमाल खरेदीसाठीही राबविण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे, असे या वेळी देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT