महाराष्ट्र

स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी स्वीडनने सहकार्य करावे - मुख्यमंत्री

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - पर्यावरणाच्या दृष्टीने स्मार्ट सिटी महत्त्वाच्या असून, राज्यातील प्रकल्पांसाठी स्वीडनने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.

स्वीडन देशाचे स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा आयव्हीएल संस्थेचे उपाध्यक्ष ओस्टेन इकेनग्रेन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची "वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, स्वीडन पर्यावरण संशोधन संस्थेच्या व्यवसाय विकास आणि विपणन व्यवस्थापक रूपाली देशमुख आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, 'स्मार्ट सिटी उभारण्याठी नियोजन करताना सांडपाणी व घनकचऱ्याचे पुनर्विघटन करून ऊर्जानिर्मितीवर भर देण्यात येत आहे. घनकचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचे काम पुण्यात सुरू आहे. नागपूर व नवी मुंबई येथेही हे प्रकल्प करण्याचा मानस आहे. या प्रकल्पांच्या आखणीसाठी व अंमलबजावणीसाठी स्वीडनने सहकार्य करावे.''

ओस्टेन इकेनग्रेन म्हणाले, की "मेक इन महाराष्ट्र' मध्ये काम करण्यास उत्सुक आहोत. पुनर्विघटनाचे काम स्वीडनमध्ये 98 टक्के झाले आहे. आमचा भर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कचऱ्यातून वीजनिर्मितीवर आहे. आमची आयव्हीएल कंपनी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देऊन स्मार्ट सिटीतील शहरांचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT