महाराष्ट्र

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख - देवेंद्र फडणवीस

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - कापूस आणि सोयाबीन पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. या प्रकरणाची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून सखोल चौकशी करण्यात येणार असून, अशा घटना रोखण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष स्वरूपाचे प्रतिबंधक किट वितरित करण्याचे कीटकनाशक कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीदरम्यान काही मंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विषारी कीटकनाशके पुरविणाऱ्या कंपन्या आणि पुरवठादारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसनेच्या मंत्र्यांनी केल्याचे समजते. या वेळी भाजपचे विदर्भातील मंत्रीही आक्रमक झाल्याचे सांगण्यात आले. या वेळी घटनेप्रकरणी तीव्र चिंता व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडून संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. या प्रकरणातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे त्यांनी आदेश दिले. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर नावे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतचे विमा संरक्षण तत्काळ देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात येईल. या योजनेचे विमा संरक्षण मिळू न शकणाऱ्या शेतमजुरांच्या कुटुंबीयांना याच योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येणार आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तांत्रिक कारणास्तव विमा कंपन्यांकडून मदत मिळू न शकल्यास त्यांनाही मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल.

अन्य निर्णय
- संरक्षक किट पुरविणे बंधनकारक
- सामाजिक दायित्व निधीतून व सरकार तर्फेही पुरवठा
- गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी
- मृत शेतकऱ्यांचा रक्ततपासणी व शवविच्छेदनाचा अहवाल तातडीने देण्याचा आदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT