Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
महाराष्ट्र

मुख्यमंत्री साहेब आज मला न्याय मिळाला..!

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - मंत्रालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या ऑनलाइन लोकशाही दिनात राज्यातील सामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यावर तातडीने मार्ग काढला जातो. असाच अनुभव आज झालेल्या लोकशाही दिनात सोलापूरच्या चनबसप्पा घोंगडे यांना आला. त्यांच्या तक्रारीवर कार्यवाही झाल्यानंतर त्यांच्या तोंडून "मुख्यमंत्री साहेब आज मला आपल्याकडून न्याय मिळाला... खाली न्याय मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत,' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया सोमवारी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनात आज बारा जणांच्या तक्रारींची दाखल घेऊन त्यावर सुनावणी करण्यात आली. त्या वेळी घोंगडे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
घोंगडे यांची लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथे जमीन आहे. त्यांच्या मालकीच्या जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची नोंद झाल्याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती. या संदर्भात केलेल्या कारवाईबाबत महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले, की याप्रकरणी केलेल्या चौकशीत तथ्य आढळल्याने फेरफार रद्द करण्यात आले असून, गाव नमुन्यावर चुकीच्या नोंदी घेणाऱ्या ग्रामसेवक व उपसरपंचाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपल्या तक्रारीवर झालेली कार्यवाही ऐकून घोंगडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आणि तालुका स्तरावरच न्याय मिळाल्यास चांगले होईल, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्यक्त केली.

लोकशाही दिनात लातूर, नांदेड, पालघर, वाशीम, सिंधुदुर्ग, धुळे, रायगड, जळगाव येथील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT