महाराष्ट्र

शिक्षकांच्या मागण्यांसाठी नागपूरमध्ये आंदोलन

सकाळवृत्तसेवा

मुंबई - प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषद विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहे. बुधवारपासून (ता. १३) तीन दिवस धरणे धरण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे यांनी सोमवारी दिली.

जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग त्वरित लागू व्हावा, अनुदानास पात्र घोषित व अघोषित शाळांना शंभर टक्के अनुदान, वरिष्ठ व निवड श्रेणीचा २३ ऑक्‍टोबरचा अध्यादेश रद्द करावा, एक हजार ३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाऊ नयेत, अशा मागण्या परिषदेने केल्या आहेत. ऑनलाइन कामांसाठी स्वतंत्र शिक्षक, कॅशलेस मेडिक्‍लेम योजना, पदवीधर ग्रंथपालांना पदवीधराची वेतनश्रेणी, शिक्षकेतरांचा आकृतिबंध घोषित करावा, रात्रशाळेतील शिक्षकांना पूर्ण वेळ दर्जा देऊन वेतन सुरू करावे, आयसीटी शिक्षकांना सेवा संरक्षण, शाळांची वीजदेयके घरगुती दराने आकारावीत आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.

शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, सहकार्यवाह नरेंद्र वातकर, कोशाध्यक्ष किरण भावठणकर, महिला आघाडी अध्यक्ष पूजा चौधरी, शिक्षक आमदार नागो गाणार, माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर व भगवान साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल. या आंदोलनात शिक्षक परिषदेचे राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

2024 च्या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मधून घेणार निवृत्ती- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT