mumbai police esakal
महाराष्ट्र बातम्या

बीडीडी चाळीत निवृत्त पोलिसांना मिळणार घर, आव्हाडांची मोठी घोषणा

पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळीत आता हक्काचे घर मिळणार आहे.

धनश्री ओतारी

मुंबई: पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळीत आता हक्काचे घर मिळणार आहे. अशी घोषणा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

बीडीडी चाळीत २२५० निवृत्त पोलिसांना घर मिळणार आहे. त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी ५० लाख रुपये घरासाठी किंमत द्यावी लागणार आहे. अशी माहिती आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटवर दिली आहे.

काय आहे ट्विट?

बीडीडी चाळीच्या प्रत्येक घराचा बांधकाम खर्च हा अंदाजे 1 कोटी 5 लाख ते 1 कोटी 15 लाख इतका आहे. पण म्हाडाने येथे असलेल्या 2250 पोलीस कर्मचाऱ्यांना तोटा सहन करून 50 लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय करारपत्रात नमूद करून करारपत्र त्वरीत दिली जातील. ह्या निमित्ताने सर्व काम मार्गी लागलेलं आहे. तेव्हा आता निवृत्त पोलिसांनी लवकरात लवकर आपली घरे खाली करावीत अशी त्यांनी विनंती केली आहे.

गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या बीडीडी चाळ (BDD Chaul redevelopment) पुनर्विकासाचे काम पुर्ण झालं आहे. नायगाव बीडीडी चाळीतील दोन चाळी केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक वर्षांपासून रुग्णालयाचे कर्मचारी राहत होते.

राज्य सरकारने बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी म्हाडाकडे सोपवली आहे. त्यानुसार म्हाडाने वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगावमधील प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.

नागरिकांच्या पुनर्वसनासाठी २२ मजल्यांचे टॉवर उभारण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात १९ चाळी तोडण्यात येतील. तेथे विक्री घटकासाठी ६० मजल्यांचे टॉवर उभारण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT