Mumbai Rain Live Updates | Rain in Mumbai esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Rain : पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ओलीपोर वलसाड इथं वाहतूक बंद

  1. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ओलीपोर वलसाड इथं वाहतूक बंद करण्यात आली.

  2. मुंबई-अहमदाबादवरील गुजरात आणि मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून वलासाड इथं वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

ठाण्यात गेल्या तासाभरात ३० मि.मी. अंधेरी 25 मिमी, मालाड 15 मिमी, बोरीवली 13 मिमी. मुंबई शहर 5-6 मिमी पेक्षा जास्त नाही. अंतर्गत भागात पावसाचा जोर अधिक सुरू आहे. मुलुंड, ठाणे, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली येथे १५ मिनिटांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरुवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जारी केला होता. यात प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि पालघरचा भाग होता.

दरम्यान, आता पुन्हा एकदा पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शिवाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.

हवामान अंदाज

मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल. अधूनमधून ४५-५५ किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील तसेच ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

अखेर 15 तासांनी सुखरुप सुटका

पालघरमध्ये वैतरणा नदीला अचनाक आलेल्या पुरामुळे 10 कामगार अडकून पडले होते. यासर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मुंबई-बडोदा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरु असताना अचानक वैतरणा नदीला पूर आल्यानं कामगार अडकले होते. अखेर तब्बल 15 तासांनी सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.

राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. मुंबई ठाण्यासह काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे पुढील 2 दिवस सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.(Mumbai Rain Live Updates | Rain in Mumbai)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT