mumbai school esakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबईतील शाळांची घंटा उद्या वाजणार की नाही? आज होणार निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महापालिका (muncipal corporation) शिक्षण विभागाकडून (education department) शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार तयारी करण्यात आली असली तरी मुंबईतील प्राथमिक शाळा प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार की नाही ? यावर आज निर्णय होणार आहे.

पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात धास्ती

राज्यातील प्राथमिक शाळा प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्या नंतर, मुंबईतील शाळांचे प्रत्यक्ष वर्ग १५ डिसेंबर पासून सुरू करण्याचे पालिकेने घोषणा केली होती. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमिक्रोन (omicron) या व्हेरीएटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही, अशी सांशकता ही पालकांमध्ये व्यक्ती केली जात आहे.

आजच्या आढावा बैठकीत होणार निर्णय

शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. काही शाळांना याविषयीची माहिती मिळाली नसल्याने त्या पुन्हा सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी आज मंगळवारी, 14 डिसेंबर रोजी सकाळी एक आढावा बैठक बोलावण्यात आली असून त्यात काही राहिलेल्या त्रुटींवर तातडीने मार्ग काढले जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यानी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

घरातील तांदळात विषारी रासायनिक पदार्थाची भेसळ, दोन वर्षीय चिमुकलीची प्रकृती गंभीर; १५ तासांत हृदय तीन वेळा बंद

Latest Marathi News Live Update : खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

Mahila Bachat Gat: अडीच एकर जमीन अन् १ लाखाचे अनुदान, फडणवीस सरकारची मोठी भेट

Scooter Airbag : आता कारप्रमाणे स्कूटर्समध्येही असतील एअरबॅग; अपघातात वाचवणार तुमचा जीव, पाहा कोणत्या कंपनीने आणली सुविधा

SCROLL FOR NEXT