St George Hospital Case esakal
महाराष्ट्र बातम्या

St George Hospital Case: सेंट जॉर्ज रुग्णालयात नेमकं काय घडलं? विधीमंडळात बोलावली तातडीची बैठक

Rahul Narvekar: रुग्णालयातील घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर या प्रकरणात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर दोन डॉक्टरांचे निलंबन झालं आहे. याशिवाय गुरुवारी दुपारी या घटनेबाबत विधीमंडळात बैठक घेणार आहे.

संतोष कानडे

Mumbai News: मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये चतुर्थश्रेणी रुग्णालयीन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. या घटनेनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन दोषींवर कारवाईचे संकेत दिले होते. त्या अनुषंगाने गुरुवारी विधीमंडळामध्ये एक तातडीची बैठक होणार आहे.

सेंट जॉर्ज रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनिस चव्हाण यांच्या डोक्याला एका अपघातात दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. परंतु दीड ते दोन तास डॉक्टर डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होतोय. वरिष्ठ डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नसल्याने त्यांना दोन ते अडीच तास उपचार मिळाले नाहीत असा आरोप चव्हाण कुटुंबीय आणि सहकर्मचाऱ्यांकडून करण्यात आलाय.

घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर या प्रकरणात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर दोन डॉक्टरांचे निलंबन झालं आहे. याशिवाय गुरुवारी दुपारी या घटनेबाबत विधीमंडळात बैठक घेणार आहे.

या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयीन कर्मचाऱ्याचाच अशा प्रकारे डॉक्टरांच्या अनास्थेमुळे मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT