mumbai university international students hostel controversy vinayak savarkar shahu maharaj name  
महाराष्ट्र बातम्या

'त्या' वसतिगृहाला सावरकरांचेच नाव; शाहू महाराजांच्या नावाची मागणी फेटाळली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई विद्यापीठामधील (Mumbai University) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला अखेर स्वांतत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याच्या निर्णयाला अखेर मंजूरी देण्यात आली आहे. यासंबंधीच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या होत्या. काही विद्यार्थी संघटनेच्या मागणीनंतर वसतिगृहाला शाहू महाराजांचे नाव द्यायचे की सावरकरांचे यावरून वाद रंगला होता.

विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. वसतिगृहाला सावरकरांचं नव्हे तर शाहू महाराजांचं नाव देण्यात यावं अशी विद्यार्थी संघटनांची मागणी आहे. त्यामुळे वसतिगृहाच्या नामकरणावरून हा नवीन वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या या वसतिगृहाला उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची सूचना केली होती. त्यानंतरा छात्रभारती तसेच इतर विद्यार्थी संघटनांनी या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याचे पत्र कुलगुरूंना दिले होते.

आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली, त्यामध्ये सावरकरांच्या नावाला मंजूरी देण्यात आली. या वादात युवा सेनेने तटस्थ भूमिका घेतली, त्यांच्याकडून सावरकर आणि शाहू महाराज हे दोघेही आमच्यासाठी आदरणीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अभविपच्या मागणीला यश आले असले तरी इतर विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. पुढे हा विरोध वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि कठोर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

''हिंदू समाजाने संयम राखावा, कोणत्याही.... ''; राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रीय संवयसेवक संघानं स्पष्टच सांगितलं!

Latest Marathi News Live Update : सिया गोयल आणि चेतन चौधरी ला पोलिसांनी न्यायालयात केलं हजर

Pune Crime: कुंजीरवाडीत एफडीएची धडक छापा; ६६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दुकान सीलबंद, विक्रेता व पुरवठादारावर गुन्हा

Success Story: रोज 3 तास ट्रॅफिकमध्ये अडकायचा! आज वडापाव विकून कमावतो लाखो रुपये; मराठी तरुणाने कसा उभारला व्यवसाय?

SCROLL FOR NEXT