Prakash Ambedkar 
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : भाजपसह सर्वांसाठी दरवाजे उघडे, पण..; प्रकाश आंबेडकर स्पष्टचं बोलले

रवींद्र देशमुख

मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत सामील होणार अशा चर्चा होत्या. शिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. मात्र चर्चा पुढे जावू शकल्या नाहीत. आज प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी बाबत आणि युतीबाबत विचारले असता, त्यांनी सर्वांसाठी आपले दरवाजे उघडले असल्याचं म्हटलं.

प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत आपले दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचं म्हटलं होतं. फ्रेंडशिप डेसाठी दरवाजे मोकळे आहेत. मग राजकीय असो वा व्यक्तीगत असो. दरम्यान भाजप तुमच्या दारात आलं तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे असेल का, त्यावर आंबेडकर म्हणाले की, त्यांना चहापानासाठी दरवाजे उघडे आहेच. पण राजकीय नाही. हे मी आधीच स्पष्ट केल्याचंही त्यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीसोबत आपली चर्चा सुरू आहे, त्यावर आंबेडकर म्हणाले की, ते तुम्ही उद्धव ठाकरेंना, सोनिया गांधींना आणि शरद पवारांना विचारा. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. जयंत पाटील-अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चेवर आंबेडकर म्हणाले की, बॉम्ब फुटायचे होते, ते फुटले. हे मी आधीच सांगितलं होतं.

दरम्यान सतीप्रथा औरंगजेबाने बंद केल्याचा दावा ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केला होता. त्यावर नेमाडे म्हणाले की, यावर इतिहासकारांना विचारा. नेमाडे हे गाजलेलं व्यक्तिमत्व आहे. ज्यांचा ज्यांचा जसा अभ्यास आहे तसा त्यांना इतिहास कळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT