महाराष्ट्र

वैद्यकीय महाविद्यालयांनाही "नॅक' निकष! 

शुभम बायस्कार

अकोला  - राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता पुर्ण सोई-सुविधा त्यातून दर्जेदार विद्यार्थ्यांनी निर्माण व्हावे यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना (सर्व विद्याशाखा) शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून "नॅक'च्या (विद्यापीठ अनुदान आयोग) निकषानुसार तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाचे परिपत्रक व विद्यान परिषदेच्या बैठकीतील मंजूर झालेल्या ठरावाअंती यासंदर्भातील आदेश विद्यापीठाने 19 ऑक्‍टोबर रोजी जारी केला आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, नर्सिंग इत्यादी पदवी व पदव्युत्तर पदावी अभ्यासक्रमाची महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये केंद्रीय व राज्य परिषदेच्या मानकानुसार आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सुविधा अर्हताप्रात्त प्राध्यापक, रुग्णालय सुविधा या बाबी चांगल्या दर्जाच्या असणे अपेक्षित आहेत. यासाठी सरकारने महाविद्यालयांची मूल्यांकनाची प्रक्रिया राबविण्यासाठी विद्यापीठाला प्राधिकृत केले आहे. "नॅक'करिता व विद्यापीठाद्वारे केले जाणारे परिणामात्मक मूल्यांकन, चौकशीअंती वेगळी कार्यवाही करण्याची आवश्‍यकता महाविद्यालयांना राहू नये यासाठी आरोग्य विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांची तपासणी ही शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून "नॅक'ने घालून दिलेल्या निकषानुसार केली जाणार आहे. 

तरच शिष्यवृत्ती मिळेल 
विद्यापीठाशी सलग्नीत प्रत्येक महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून 'नॅक'कडे नोंदणी करून घेणे आवश्‍यक आहे. तरच त्यांना शिष्यवृती प्रदान केली जाईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. जे महाविद्यालय "नॅक'मार्फत मूल्यांकन करून घेणार नाहीत, अशा महाविद्यालयांची सूची विद्यान परिषदेकडे सादर केली जाणार आहे. त्यानंतर सदर महाविद्यालयांवर विद्यापीठांमार्फत करवाई केली जाणार आहे. 

दर्जेदार शिक्षण व विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यापीठाशी संलग्न सर्वच महाविद्यालयांची तपासणी ही शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून "नॅक'ने घालून दिलेल्या निकषानुसार होईल. या माध्यमातून महाविद्यालयांच्या सोई-सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडून येतील. 
-डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT