Nagpur Crime 
महाराष्ट्र बातम्या

Nagpur Crime: बापरे! काय झाले या मुलांना? 'सॉरी' न म्हटल्याने चाकूने सपासप वार करून एका तरुणाची हत्या

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: इन्स्टाग्रामवर गर्लफेंडसोबत चॅट केल्यानंतर दोन युवकांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यामध्ये एका युवकाचा चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली. श्रेयांश शैलेष पाटील (वय २१ रा. बाराखोली) असे मृताचे नाव असून याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

२१ वर्षीय युवकाच्या खूनाची ही घटना बाराखोली परिसरातील बुद्ध विहाराजवळ गुरूवारी (ता.२९) दुपारी १२.४० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयांश हा कपड्याचा दुकानात काम करीत होता.

आई-वडील मजुरी करतात. श्रेयांश आणि त्याची प्रेमिका हे दोघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या फ्रेंडलिस्टमध्ये होते. त्यात अमित मेश्राम (वय १८) हा श्रेयांशच्या प्रेमिकेच्या फ्रेंडलिस्टमध्ये होता. ते दोघेही एकमेकांशी बोलायचे.

ही बाब श्रेयांशला माहिती पडली. त्याने अमितच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर जाऊन त्याला तिच्याशी बोलू नको असे सांगितले. याशिवाय त्याला अश्‍लिल शिविगाळ केली. यामुळे अमित भडकला.

गुरुवारी दुपारी तो आपला मित्र आणि लहान भावासह श्रेयांशला भेटायला गेला. यावेळी श्रेयांश हा एनआयटी गार्डन येथे बसण्याकरिता पायी जात असताना काहीच अंतरावर तिघांनी त्याला गाठून शिविगाळ का केली, अशी विचारणा केली.

तसेच स्वारी म्हणण्यास सांगितले. मात्र, श्रेयांशने त्याला पुन्हा शिविगाळ करीत, प्रेमिकेपासून दूर राहण्यास सांगितले. आम्ही मित्र असल्याचे अमितने सांगताच श्रेयांश भडकला

बापरे! काय झाले या मुलांना?

आणि सोबत आणलेल्या चाकूने अमितच्या हातावर वार केला. यावेळी अमितच्या भावाने रॉडने वार करीत श्रेयांशच्या हातातील चाकू खाली पाडला. त्यानंतर तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

त्याचवेळी अमितने खाली पडलेला चाकू उचलून श्रेयांशवर सपासप वार केले. श्रेयांश रक्ताच्या थारोळ्यात खाली पडताच तिघेही ॲक्टिवावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच, सहायक पोलिस आयुक्त खांडेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल आणि पोलिस निरीक्षक कुंभार हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयोमध्ये रवाना केला.

पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवित, अमितसह तिघांना हुडको कॉलोनीतून अटक करीत गुन्हा दाखल केला.

परिसरात तणाव

श्रेयांशच्या खुनामुळे बाराखोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. श्रेयांशच्या अंत्यविधीपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा तैनात केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देत, पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्यावर ट्रम्प इफेक्ट! एका दिवसात मोठा उलटफेर! जाणून घ्या आजचे ताजे भाव

Monsoon El Nino Impact India : यंदा एल निनोचा इशारा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मॉन्सूनचा पाऊस कमी, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Thalapathy Vijay: बहुमतापासून १० आमदार दूर; काँग्रेसच्या ५ जागांवर TVK चा खेळ कसा फिरणार? सत्ता स्थापनेची समीकरणे कशी बदलणार

Congress Muslim Candidates Success : काँग्रेसच्या विजयी उमेदवारांत मुस्लिम सर्वाधिक; आसाम ते केरळपर्यंत 'मुस्लिम' उमेदवारांचाच स्ट्राइक रेट जबरदस्त!

Latest Marathi News Live Update : काळाराम मंदिरावर आज पुन्हा झळकणार भगवी धर्मध्वजा, धार्मिक वैभवाचा ऐतिहासिक क्षण

SCROLL FOR NEXT