Winter Session 2022
नागपूर इथं सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आजचा दिवस चांगलाच गाजला. यातच महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. याबाबत ३९ आमदारांचं पत्र महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना देण्यात आलं. (No confidence motion by MVA against Assembly Speaker Rahul Narvekar)
मात्र या प्रस्तावावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीच स्वाक्षरी नसल्याचं सांगण्यात येत आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
विरोधकांनी सभागृहात अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अध्यक्षांकडून त्यांना बोलू दिलं गेलं नाही. त्यामुळं विधानसभा अध्यक्षांविरोधातील ३९ आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन सुनील केदार, सुनील प्रभू, सुरेश वरपूडकर, अनिल पाटील हे विधानसभा सचिवांना जाऊन भेटले. विधानसभा अध्यक्ष नियमाबाह्य पद्धतीनं कामकाज चालवत असल्याची तक्रार या पत्रातून करण्यात आला आहे.
मात्र या पत्रावर अजित पवार यांचीच स्वाक्षरी नसल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रामध्ये पहिलं नाव नाना पटोले यांचं आहे. मात्र अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे अधिवेशनासाठी सभागृहामध्ये अजित पवार उपस्थित होते. या वृत्तासंबंधीची पुष्टी अद्याप झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.