Dikshabhumi News esakal
महाराष्ट्र बातम्या

Dikshabhumi News: दीक्षाभूमीतल्या अंडरग्राऊंड पार्किंगचा वाद पेटला; आंदोलकांकडून बांधकामाच्या ठिकाणी जाळपोळ

Dikshabhumi Nagpur Latest Updates: आंदोलकांनी बांधकाम साहित्य आणि बोर्डाची तोडफोड केली आहे. शिवाय बांधकाम साहित्य पेटवून दिलं आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, दीक्षाभूमी हा आस्थेचा विषय आहे. त्यांची भावना लक्षात घेऊन विकास व्हावा. जनभावना लक्षात न घेता सरकारने आपसात भांडण लावून देऊ नये.

संतोष कानडे

नागपूरः नागपूरमध्ये दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंगला नागरिकांनी विरोध केला आहे. यावेळी संतप्त आंदोलकांनी बांधकामाचं साहित्य फेकून देत निषेध नोंदवला. तसेच बांधकाम साहित्य पेटवून देण्यात आलं.

दीक्षाभूमीमध्ये विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. यात मात्र अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध होत आहे. या अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी समाजबांधवांनी कडाडून विरोध केला आहे. सोमवारी मोठ्या संख्यने समाजबांधव दीक्षाभूमीवर एकत्र आले आणि त्यांनी पार्किंगचं काम थांबवलं.

आंदोलकांनी बांधकाम साहित्य आणि बोर्डाची तोडफोड केली आहे. शिवाय बांधकाम साहित्य पेटवून दिलं आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, दीक्षाभूमी हा आस्थेचा विषय आहे. त्यांची भावना लक्षात घेऊन विकास व्हावा. जनभावना लक्षात न घेता सरकारने आपसात भांडण लावून देऊ नये.

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, बौद्ध अनुयायी यांना विश्वासात न घेता श्रद्धास्थानाला धक्का लावण्याचं काम सुरू आहे. नको ते करायला जाता कशाला? सरकारने ताबडतोब काम थांबवावं.

सभागृहामध्ये बोलताना नितीन राऊत म्हणाले की, अंडरग्राऊंड पार्किंगची आज तोडफोड सुरु आहे. हा लोकांच्या भावनांचा विषय आहे. स्मारक समितीने कोणतं बांधकाम करत आहोत यांची लोकांना सुचना द्यायला पहिजे होती.. अंडरग्राउडं पार्किंग कोणासाठी करत आहेत? याचं उत्तर द्यावं, असं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT