PM Kisan Yojana  Esakal
महाराष्ट्र बातम्या

PM Kisan Scheme: हजारावर शेतकऱ्यांचे ‘लँड सिडिंग’ रखडले, पीएम किसानच्या लाभासाठी पूर्तता आवश्यक, ई-केवायसी असणं आवश्यक

PM Kisan KYC: केंद्र शासनामार्फत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभाची १६वी किस्त जमा करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

PM KISAN Scheme Land Seeding: केंद्र शासनामार्फत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभाची १६वी किस्त जमा करण्यात येणार आहे. परंतु तत्वपूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत असणे, ई-केवायसी प्रमाणिकरण व बँक खाती आधार संलग्न असणे आवश्यक आहे.

परंतु जिल्ह्यातील एक हजार ४१३ शेतकऱ्यांची भूमी अभिलेख नोंदणी अर्थात लॅंड सिंडिग बाकी असल्याने संबंधित शेतकऱ्यांना पीएम किसानच्या पुढील किस्तीचा लाभ मिळेल अथवा नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे.

त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १५व्या हप्त्याची रक्कम मिळाली असून लवकरच १६व्या हप्त्याची किस्त देण्यात येणार आहे. सदर हप्त्याच्या लाभासाठी केंद्र सरकारने तीन बाबी बंधनकारक केल्या असून त्याची पूर्तता न केलेल्यांना हप्ता मिळणार नाही.

या बाबींची पूर्तता आवश्यक


- राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लॅंड सिडींग क्रमांक अद्ययावत करणे शासनाने आवश्यक केले आहे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांना तहसिल कार्यालयात संपर्क साधावा लागेल. ही कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी तहसिलदारांची आहे. (Latest Marathi News)
- पीएम किसानसाठी ई-केवायसी प्रमाणिकरण करणे आवश्यक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया स्वतः लाभार्थी शेतकऱ्याला करावी लागेल. त्यासाठी शेतकऱ्याला सीएससी केंद्र किंवा पीएम किसानच्या संकेतस्थळावर जाणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याला बॅंक खाते आधार संलग्न करणे सुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्याला बॅंकेत जाऊन बॅंक खात्यात आधार संलग्न करणे आवश्यक आहे

आधार सिडिंग रखडलेल्या शेतकऱ्यांची संख्या


तालुका शेतकरी संख्या
मूर्तिजापूर १०५
अकोट १२९
तेल्हारा १२९
बार्शीटाकळी २०१
पातूर २०१
बाळापूर २५७
अकोला ३९१
--------------------------
एकूण १४१३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT