Jayant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

जयंत पाटलांनी 'या' मुद्द्यावरून सरकारला धरलं धारेवर; म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांना झुकवल्याशिवाय शांत बसणार नाही'

शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला (Maharashtra Government) टार्गेट केले.

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने विधानभवनाच्या प्रवेशद्वाराशी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.

सांगली : शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला (Maharashtra Government) टार्गेट केले आहे. चहूबाजूने शेतकरी बांधव संकटात सापडला आहे. त्यांना सहाय्य करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारचा तोल ढासळल्याचे हे लक्षण आहे, अशी टीका जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.

जयंत पाटील यांनी ‘एक्स हँडल’वरून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने विधानभवनाच्या प्रवेशद्वाराशी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची आर्तता त्याच्या आवाजात होती. दुर्दैव म्हणजे सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला गेला.

चहूबाजूने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांना सहाय्य करण्याऐवजी आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारचा तोल ढासळल्याचे हे लक्षण आहे. शेतकरी बांधवांना विनंती आहे, की हार मानू नका. सत्ताधाऱ्यांना झुकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभच्या ‘डॉन’चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड! चंद्र बरोट यांचं निधन, फुफ्फुसाच्या आजाराशी सात वर्षांची झुंज संपली!

Gutka Smuggling: पावणेचार लाखांच्या गुटख्यासह १३ लाखांचा ऐवज जप्त

Amravati News: लाभार्थ्याचे अनुदान दुसऱ्याच्याच खात्यात जमा; अमरावती जिल्ह्यात घरकुल योजनेतील प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Gondia Accident: आमदार फुकेंच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक; चालकाचा मृत्यू, हिरडामाली येथील घटना, काही काळ तणाव

Hand Health Signs: हात देत आहेत शरीरातील आजारांचे संकेत? हे 6 बदल लगेच ओळखा आणि त्यावर उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT