Amit Deshmukh and Ashok Chavan 
महाराष्ट्र बातम्या

...तर नांदेड, लातूरकर भाजपच्या मांडीवर बसायला तयार; दिग्गज नेत्याच्या दाव्याने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मागील काही दिवसांपासून पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच मराठवाड्यातील नांदेडकरांसह लातूरकरही भाजपच्या वाटेवर असल्याचं सूचक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर भाजपने बाहेर पडलेल्या शिंदे गटासोबत सरकार स्थापन केलं. मात्र हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला असून १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहेत. 16 आमदार पात्र ठरले तरच सरकार कायम राहणार आहे. आता याबाबत प्रकाश आंबेडकरांनी सूचक विधान केलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारमधील १६ आमदार अपात्र ठरले तर नांदेडकर आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर जावून बसायला तयार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टांगती तलवार आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी भाजपचा बॅकअप प्लॅन नांदेडचं चव्हाण कुटुंबीय आणि लातूरचं देशमुख कुटुंबीय असल्याचं सूचक विधान कोणाचंही नाव न घेता केलं आहे.

नांदेडमध्ये सुरू असलेल्या धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं. काँग्रेसचा उपक्रम चांगला आहे. मात्र त्यातून काही साध्य होईल, असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT