narayan rane esakal
महाराष्ट्र बातम्या

"रात्री करायच्या गोष्टी संजय राऊत दिवसा करतात"

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : "रात्री करायच्या गोष्टी संजय राऊत (sanjay raut) दिवसा करतात असे त्यांचे लिखाण बघून वाटतंय. कारण लिखाण करताना भान नसते असे वाटते." भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टीका करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आणखी काय म्हणाले नारायण राणे...

डोक्याविना संजय राऊत....

आम्ही दिल्लीत धडक मारू म्हणतात, पण धडक कशी मारतात हे माहिती नाही वाटतं. दिल्लीला धडक मारायला आले तर डोक राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसणार आहे. भाजपवर, मोदींवर टीकेचा भडीमार सुरू आहे. तुमची ५६ आमदार आहात. ते मोदींमुळे निवडून आले आहात. संजय राऊतांचा अग्रलेखही वाचला. देशात काही पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये दादरा नगर हवेलीच्या निवडणुकीत एक जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकली. शिवसेनेनी मात्र आम्ही जिंकलो असा डंका सुरू केला. त्या उमेदवाराची निवडणूक निशाणी मागविली. त्यामध्ये फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची निशाणी आहे. दुसऱ्याच्या मुलाचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहे. डेलकर निवडून आल्या. आम्हाला मोठं यश मिळालं आता आम्ही दिल्ली काबीज करणार, असं म्हणतात, अशी टीकाही त्यांनी संजय राऊतांवर केली.

असे फटाके फक्त आघाडी सरकारच्या दुकानात मिळतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी बारामती दौऱ्यावर गेले होते. यावेळी फटाके वाजवा. पण धूर सोडू नका, असं म्हणाले होते. त्यावरुनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ''असे फटाके फक्त आघाडी सरकारच्या दुकानात मिळतात. असाच एक धूर बारामतीत सोडण्यात आला. त्याला आवाजही नव्हता धूरही नव्हता. फक्त वास होता'' असं नारायण राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT