Warishe Murder Case
Warishe Murder Case 
महाराष्ट्र

Warishe Murder Case : वारिशेंच्या हत्येच्या प्रश्नावर नारायण राणे संतापले! म्हणाले, "तोच विषय..."

सकाळ डिजिटल टीम

Warishe Murder Case : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. याप्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील आक्रमक झाली आहे तसेच स्थानिक पातळीवरही या घटनेवरुन संताप व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. शशिकांत वारिशे यांची हत्या का झाली, कशी झाली हे पोलिस तपासात समोर येईल. संजय राऊत, विनायक राऊत यांच्या आरोपांची मी दखल घेत नाहीत. ते काही देशाचे मोठे नेते नाहीत, असे नारायण राणे म्हणाले. 

"कुठलीही हत्या झाली, अपघात झाला तर तेवढेच प्रश्न विचारायचे का. पुण्यात विकासाचे, सामाजिक कोणतेच विषय नाही आहेत का?. पत्रकारांनी कुठलाही विषय आला तर तोच लाऊन धरायचा का? स्थानिक प्रश्न प्राधान्यांने विचारले पाहीजे. जिकडे जावे तिकडे तोच विषय आहे, काय लावलं हे. चौकशी होत आहे, या प्रकरणात कुणाचे नाव असेल तर तो पाहून घेईल," असे नारायण राणे म्हणाले. 

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणानं राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. राज्यभरातील पत्रकारांसह, वारिशे कुटुंबिय आणि शिवसेनेनं यासंदर्भात फडणवीस यांना पत्र लिहिलं असून यातून गंभीर आरोपही केले आहेत. या प्रकरणामुळं राज्य सरकारवर तातडीनं पावलं उचलण्यासाठी दबाव वाढत होता. यापार्श्वभूमीवर पोलिसांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT