Narayan Rane-Nitesh Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

'नितेशला जामीन मंजूर होणार की नाही, हे सांगायला मी ज्योतिषी नाही'

तुषार सावंत

राणेंच्या मनात भीती आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय.

कणकवली : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामिनावर काही तासांत सुनावणी होणार आहे. यावर नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, जामीन मंजूर होणार का नाही हे सांगायला मी ज्योतिषी नाही. निकाल झाल्यानंतर जाहीरपणे बोलेन, असंही त्यांनी म्हटलंय.

त्यामुळं नेमकेपणाने राणेंच्या मनात भीती आहे काय?, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. जिल्हा बँक निवडणूक (District Bank Election) आणि पोलीस (Police) कारवाई यावर नजर ठेवण्यासाठी राणे जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. आज ते कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानावरून बाहेर पडत असताना माध्यमांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. मात्र, त्यांनी एकच उत्तर देऊन माध्यमांशी बोलणं टाळलं. अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयानं अंतिम सुनावणी पटलावर ठेवण्यापूर्वी प्रलंबित निकाल जाहीर केल्याशिवाय अटकपूर्व जामीन निर्णय जाहीर केला जाणार नाही, असं सुनावलंय. काल दिवसभरात लागून राहिलेली प्रतीक्षा अजूनही ताणूनच आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात (Court) आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अंतिम सुनावणी दुपारी तीननंतर केव्हाही होऊ शकते, त्यामुळं परिसरात वातावरण तंग आहे.

एकीकडं जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानाला केवळ काही तासच शिल्लक राहिले आहेत. उद्या प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये मतदान होणार आहे. याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. मतदान केंद्राबाहेर बूथ लावण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नियोजन करताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे आमदार राणे यांच्या अटकपूर्व जामिनाच्या निकालाची ही प्रतीक्षा कार्यकर्त्यांना आहे, त्यामुळं नेमकेपणानं काय होणार निकाल काय लागेल याची उत्सुकता आहे. मात्र, कणकवलीत घडलेल्या हल्ल्या प्रकरणांमध्ये स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी पसरलेली आहे. अशा प्रकारामुळं बाजारपेठेवर मोठा परिणाम होत आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं हा निकाल कोणाच्या बाजूनं लागेल किंवा न लागेल, मात्र अशा घटना यापुढं झाल्यास जनमाणसांमधील वातावरण निश्चित बिघडणार आहे. राजकीय मंडळींना आणि कार्यकर्त्यांना यापुढे सामाजिक भान ठेवूनच राजकारण करावं लागणार आहे, अन्यथा अशा घटना दूरगामी परिणाम प्रत्येकाला भोगावा लागणार आहे, अशी सध्या स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

Mumbai Crime: पाणी भरण्यावरून वाद; महिलेचं डोकं फिरलं; घरातून मॉस्किटो किलर स्प्रे आणलं अन्...; व्यक्तीसोबत नको ते घडलं

चालू सीझरमध्येच डॉक्टरांनी मला प्रश्न विचारला की... मराठी अभिनेत्रीने सांगितला डिलिव्हरीचा तो अनुभव

IND vs SA: 'कोलकाता कसोटीच्या चार दिवसांपूर्वी BCCI चे क्युरेटर आले आणि...', सौरव गांगुलीचा खुलासा

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

SCROLL FOR NEXT