महाराष्ट्र

हुतात्मा पायलटचे वडील म्हणतात, 'भेटायला आला तर आमचा, नाहीतर...'

सकाळन्यूजनेटवर्क

नाशिक- सैन्यात सेवेत असणाऱ्याच्या मनाची मानसिकता ही अधांतरीतच असते आम्हाला भेटायला आला तर तो आमचा नाही आला तर तो भारतमातेचा अशी भावना मनाशी बाळगून आम्ही दिवस कंठत असतो. निनादने आज आपल्या सेवेत असताना आमचे आणि देशाचे नावं मोठ केलं आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असल्याची भावना बडगाम विमान दुर्घटनेत हुतात्मा झालेल्या निनादच्या वडिलांना बोलून दाखवली.

दरम्यान, डीजीपीनगर बँक कॉलनी येथे 12 नंबरच्या बंगल्यात रहिवासी असलेले निनाद अनिल मांडवगणे आज विमान दुर्घटनेत शहीद झाले. 
डीजीपीनगर नाशिकचे निनाद यांचा जन्म 1986ला झाला होता. निनादचे शिक्षण 05 वी ते 10 पर्यंत भोसला मिलिटरी मध्ये तर 11 वी व 12 चे शिक्षण औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत झाले होते.

नंतर त्याने बी. ई. मेकॅनिकल इंजिनीयरिंग पूर्ण करून हैद्राबाद ट्रेनिंग कमिशन मध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर 2009 ला एयर फोर्स मध्ये स्कॉड्रन लिडर पदावर सेवेत रुजू होऊन  गुवाहाटी, गोरखपूर येथे सेवा करून 01 महिन्यापूर्वीच श्रीनगर येथे बदली झाली होती. आज ही दुःखद घटना घडली आहे. 


दरम्यान, निनादचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. आता ते सेवानिवृत्त झाले असून आईपण सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. निनाद हा त्यांचा मोठा मुलगा असून  लहान मुलगा जर्मनीत सी. ए. पदावर सेवेत आहे. निनादच्या मागे 02 वर्षांची मुलगी असून कुटुंबातील मोठा व्यक्ती सोडून गेला आहे हे मोठं दुःख झालं असल्याचं कुटुंबीयांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT