Sanjay Raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ!नाशिक पोलिसांची कारवाई; 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल

रुपेश नामदास

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी, एक आवाहन केलं होतं की राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करू नये, त्यामुळे त्याच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जनतेने या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. काही दिवसांआधीच सत्ता संघर्षावर सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. यावर सर्वच नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. तसेच शिंदे ठाकरे असे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. संजय राऊतांनी सरकारविरोधी वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सरकार अपात्र आमदारांच्या भरवशावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यामुळे जनतेने घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलेल्या सरकारच्या नियमांचे पालन करू नये, असं आवाहन संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळे या वक्तव्यावरून संजय राऊतांवर कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News: निलेश घायवळ टोळीतील फरार सदस्य जयेश वाघला अटक; कोथरूड गोळीबार प्रकरणात होता सहभाग

आर्यनच्या दिग्दर्शनाखाली शाहरुखचं शूटिंग? बाप-लेकाची जुगलबंदी रंगणार, लेकाच्या चित्रपटात वडिलांची मुख्य भूमिका!

Kolhapur Sugarcane : ऊसदर आंदोलनापासून १० वर्षे लांब राहिलेले माजी आमदार उल्हास पाटलांची अचानक एन्ट्री, 'आंदोलन अंकुश'ला पाठींबा; Video Viral

Kolhapur Drugs Deal : १२ ग्रॅम एमडी ड्रग्जसाठी लाखो रुपयांची डील; पुणे-बंगळुरू हायवेवर पोलिसांची सिने स्टाईल कारवाई

Kidney Disease: भारतात किडनीच्या आजारांचा विळखा, तब्बल 10 कोटींपेक्षा जास्त रुग्ण, अहवालात धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT