kishori pednekar slams navneet rana over challenge to cm uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

नवनीत राणा दिल्लीकडे रवाना, भाजपच्या नेत्यांसोबत फिल्डिंग?

सकाळ डिजिटल टीम

राजद्रोहाच्या खटल्यात जामीन मंजूर झाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी आता दिल्लीचा रस्ता धरला आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने अन्याय केला असून लोकप्रतिनिधीला चुकीची वागणूक दिल्याने उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार करणार असल्याचं नवनीत राणांनी म्हटलंय. (Navneet Rana Leaves to Delhi)

राणा दाम्पत्य दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. (Navneet Rana News) केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचंही रवी राणांनी म्हटलं आहे. राणांच्या दिल्लीत भाजपच्या नेत्यांसोबत भेटीगाठी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या वादानंतर झालेल्या घडामोडीनंतर चर्चेत असलेल्या नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून सुटका मिळाली. बाहेर आल्यावर त्यांनी ठाकरे सरकारला आमची काय चूक होती असा सवाल करत, "तुम्ही आम्हाला हनुमान चालीसाच्या कारणावरुन अटक करत असाल तर मी चौदा दिवसंच काय चौदा वर्षे तुरूंगात राहायला तयार आहे." असं म्हटलं. ठाकरेंना चॅलेंज करत त्या आता दिल्लीला रवाना झाल्या आहेत.

अनिल परब आणि संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचारा प्रकरणी सुरू असलेल्या केसेसवर आम्ही केंद्रीय यंत्रणांकडून माहिती घेणार आहोत. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पाठपुरावा करणार असून त्यावर लवकरात लवकर कारवाईची मागणी करणार असल्याचं राणांनी सांगितलं.

  • पोलीस विभागाचा वापर करून महिला खासदाराला वाईट वागणूक दिली

  • याची तक्रार आम्ही दिल्लीत करणार आहोत

  • माझा मुंबईत एकच फ्लॅट आहे. अनिल परब आणि संजय राऊत यांना फ्लॅटचं मोजमाप करायला पाठला

  • महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्यात आहे की नाही, अशी परिस्थिती आहे.

  • पण अजितदादा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहात आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT