महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध; उद्या 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणी भाजप सरकार व NCB विरोधात अनेक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांचे आरोप खोडून काढले होते. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर आता नवाब मलिक यांनी हे आरोप खोडून काढत देवेंद्र फडणवीस यांचेच अंडरवल्डशी संबध असल्याचा खुलासा करणार आहेत.

उद्या मुंबईत अंडरवर्ल्डचा हायड्रोेजन बॉम्ब फोडणार

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या मदतीनं राज्य वेठीला धरलं. फडणवीसांचे अंडरवल्डशी संबध असल्याचा खुलासा करणार असून उद्या मुंबईत अंडरवर्ल्डचा हायड्रोेजन बॉम्ब फोडणार, फक्त १० वाजेपर्यंत थांबा असे मलिक म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांवर (Nawab Malik) गंभीर आरोप केले आहेत. कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड ही जमीन नवाब मलिकांनी दाऊदच्या माणसांकडून विकत घेतली, असा गंभीर आरोप फडणवीसांचा आहे. त्यानंतर आता मलिकांनी फडणवीसांना उत्तर दिले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की, दिवाळीनंतर ते राजकीय फटाके फोडणार आहेत. पण आम्हाला वाटतं की त्यांचे फटाके भिजले आणि वाजलेच नाहीत. फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांचा बॉम्बस्फोटाच्या लोकांशी संबंध असल्याचा माहोल तयार केला. पण त्यांना माहिती देणारे कच्चे खेळाडू आहेत, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर पलटवार केला आहे. मंत्री नवाब मलिकांनी (Minister Nawab Malik) उत्तर दिले आहे. मी कोणत्या बॉम्बब्लास्ट प्रकरणातील आरोपीकडून जमीन खरेदी केली नाही, असं स्पष्टीकरण मलिकांनी दिलं आहे.

नवाब मलिकच्या मुलाने खरेदी केली दाऊदच्या माणसाकडून जमीन

हा राष्ट्र हिताचा मुद्दा आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेस सुरुवात केली. सरदार शहाबअली खान. हे 1993 च्या बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप होती आणि ती कायम केली. याच्याकडे मुंबई महापालिका आणि बीएसीची रेकी केली आणि टायगर मेमनच्या घरी तो होता. त्याने बॅाम्ब बनवत होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. सॅालिडस असे नाव आहे. फराझ मलिक नवाब मलिक यांच्या मुलाने खरेदी केली. त्यावेळी जमिनीचा दर काय होता ही जमीन 30 लाखात विकत घेतली होती, असा खुलासा फडणवीस यांनी केला .

सरदार वली खानसोबत काय संबंध?

सरदार वली खान हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोप असून त्याच्याकडून गोवावाल कंपाऊंड येथील मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यालाच उत्तर देताना मलिक म्हणाले, ''सरदार वली खानचं आज पण गोवावाला कंपाऊंडमध्ये घर आहे. आधी त्याच्या वडिलांचे घर होते. सरदारवली खानचे वडिल तिथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. तिथे भाडं वसूल करण्याचं काम करत होते. त्यांनी सातबाऱ्यावर स्वतःचं नाव चढवून घेतलं होतं. आम्ही देखील तिथे भाडेकरू म्हणून राहत होतो. त्यावेळी जागेच्या मालकिनने आम्हाला मालकी हक्क घेण्यास सांगितले. त्यावेळी सुरक्षारक्षकाचं नाव काढण्यासाठी आम्ही पैसे दिले होते हे खरं आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT