Nawab Malika
Nawab Malika Team eSakal
महाराष्ट्र

मलिकांनीच शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवला; BJP आमदार श्वेता महालेंचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA) आणि विरोधीपक्ष असलेल्या भाजपमध्ये (BJP) जोरदार संघर्ष सुरु आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांवर भाजपने गंभीर आरोप केले आहे. याच सर्व घडामोडींदरम्यान, मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली. दाऊदशी (Dawood Ibrahim) संबंधीत मालमत्तांच्या 300 कोटींच्या व्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून, या घटनेला आता एक महिना पूर्ण होईल. त्यातच आता भाजपच्या आमदार श्वेता महालेंनी नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा चर्चेत होता. त्यानंतर आता भाजप आमदार श्वेता महाले यांच्या आरोपांमुळे खळबळ निर्माण झाली आहे. नवाब मलिक यांनीच शिवसेना भवनासह मुंबईत इतर ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप श्वेता महालेंनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता पुढे त्या असंही म्हणाल्या की, ज्या मलिकांनी शिवसेनाभवनात बॉम्बस्फोट घडवले, त्याच मलिकांना वाचवण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करत असल्याचा आरोप श्वेता महालेंनी केला आहे.

काय म्हणाल्या आमदार श्वेता महाले?

शिवसेनेने त्याच दिवशी हिंदुत्वाला लाथ मारली, जेव्हा ते सत्तेसाठी काँग्रेससोबत गेले. राज्यात एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांनाच संरक्षण दिलं जातंय. बाळासाहेब ज्या हिंदुत्वादासाठी लढले, तेच उद्धव ठाकरे विसरलेत, शिवसेनेचं हिंदुत्व आता फक्त अंगावर चढवण्यापुरतं राहिलं असं श्वेता महाले म्हणाल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT