nawab malik  file photo
महाराष्ट्र बातम्या

सरदार वली खान, सलीम पटेलचे काय संबंध? मलिकांनी केलं स्पष्ट

भाग्यश्री राऊत

मुंबई : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असून त्यांनी दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहेत. त्यालाच आता मंत्री नवाब मलिकांनी (Minister Nawab Malik) उत्तर दिले आहे. मी कोणत्याही बॉम्बब्लास्ट प्रकरणातील आरोपीकडून जमीन खरेदी केली नाही, असं स्पष्टीकरण मलिकांनी दिलं आहे.

सरदार वली खानसोबत काय संबंध?

सरदार वली खान हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असून त्याच्याकडून गोवावाला कंपाऊंड येथील मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यालाच उत्तर देताना मलिक म्हणाले, ''सरदार वली खानचं आज पण गोवावाला कंपाऊंडमध्ये घर आहे. आधी त्याच्या वडिलांचे घर होते. सरदारवली खानचे वडिल तिथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. तिथे भाडं वसूल करण्याचं काम करत होते. त्यांनी सातबाऱ्यावर स्वतःचं नाव चढवून घेतलं होतं. आम्ही देखील तिथे भाडेकरू म्हणून राहत होतो. त्यावेळी जागेच्या मालकिणीने आम्हाला मालकी हक्क घेण्यास सांगितले. त्यावेळी सुरक्षारक्षकाचं नाव काढण्यासाठी आम्ही पैसे दिले होते हे खरं आहे'', असं नवाब मलिक म्हणाले.

सलीम पटेलचा काय संबंध? -

सलीम पटेल हा दाऊदची बहीण हसीना पारकरचा महत्वाचा माणूस होता. मलिकांनी खरेदी केलेल्या जमीनीचा तो पॉवर ऑफ अटर्नी होता, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर मलिक म्हणाले, '' ती जमीन गोवावाला कुटुंबीयांची होती. त्यांनी सलीम पटेल हा पॉवर ऑफ अटर्नी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आम्ही त्याच्याकडून जमीन घेतली. त्याचे कोणासोबत काय संबंध होते हे आम्हाला माहिती नाही.''

''कुठल्याही बॉम्बब्लास्टमधील आरोपींकडून आम्ही जमीन खरेदी केली नाही. मी केलेला व्यवहार अचूक होता. तो बॉम्बब्लास्टमधील आरोपी आहे हे जगाला माहिती आहे. पण, त्याने जमीनीवर नाव चढवून घेतल्यानंतर आम्ही काय करणार? ते नाव काढण्यासाठी आम्ही त्याला पैसे दिले'', असेही नवाब मलिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT