nawab malik esakal
महाराष्ट्र बातम्या

नवाब मलिकांचा समीर-जास्मीन वानखेंडेवर नवा आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी (drugs party) प्रकरणी एनसीबीच्या (NCB) कोठडीत असलेला अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला कोर्टानं जामीन (bail denied) नाकारला असून त्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) वर हल्ले सुरूच ठेवले आहेत. मलिक यांनी नवे प्रश्न उपस्थित करत एनसीबीचे समीर वानखेडे व जास्मीन वानखेडे यांच्यावर नवा आरोप केला आहे.

नवाब मलिकांचा नवा आरोप

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि जास्मीन वानखेडे यांच्यावर नवा आरोप केला आहे. समीर वानखेडे आणि जास्मीन वानखेडे यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केल्याचा नवाब मलिक यांचा आरोप आहे. कोरोना काळात फिल्म इंडस्ट्रीतील लोक दुबई, मालदीवला होते, तिकडे जाऊन वसुली केल्याचा आरोप करण्यात आला आहे, याबाबतचे फोटो नवाब मलिक यांनी समोर आणले आहेत.

सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर समीर वानखडेंची NCB मध्ये एंट्री

दरम्यान अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर समीर वानखडे यांना केंद्र सरकारने NCB मध्ये आणले. आणि एनसीबीत आल्यानंतर रिया चक्रवर्ती अटक केली. 4 हजार रुपयांच्या व्यवहाराच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. Whatsapp chat माध्यमातून अभिनेते आणि अभिनेत्री NCB च्या दारात उभे राहिले आणि एक दहशत निर्माण करण्याचे काम या माध्यमातून झाले.कोविडच्या काळात ही फिल्म इंडस्ट्री मालदीव मध्ये होती. त्याकाळात यांच्या परिवारातील लोक मालदीव आणि दुबई मध्ये होते. वानखडे स्वतः दुबई मध्ये होते का? मालदीव ला गेले होते का? त्यांची लेडी डॉन मालदीव ला गेली होती का,याचे उत्तर त्यांनी द्यावे? असे प्रश्न देखील नवाब मलिकांनी केले आहेत.

रेव्ह पार्ट्यांवर यापूर्वीही अनेकदा कारवाया झाल्या आहेत. त्यावेळी जेव्हा केव्हा संशयित सापडत होते, तेव्हा त्यांचे रक्त व लघवी नमुन्यासाठी घेऊन संशयितांना सोडलं जायचं. त्यानंतर एखाद्याचा नमुना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना अटक करून कोर्टात हजर केलं जात होतं. त्यानंतर पुढं न्यायालयीन कारवाई सुरू व्हायची. गेल्या वर्षभरात एनसीबीनं अनेकांवर आरोप केले किंवा त्यांना अटक केली, पण त्यांचे रक्ताचे किंवा लघवीचे नमुने कधीही घेतले नाहीत. ज्या आरोपींना ताब्यात घेतलं जात आहे, त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्यानं त्यांची टेस्ट केली जात नाही. फक्त व्हॉटस्ॲप चॅट आधारावर त्यांना आरोपी ठरवलं जात आहे. त्यांच्या केसेस खोट्या असल्यानंच नमुने घेतले जात नाहीत,' असा आरोप मलिक यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT