sameer wankhede
sameer wankhede esakal
महाराष्ट्र

NCB : ...आणि समीर वानखेडेच उभे राहीले साक्षीदाराच्या पिंजऱ्यात!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेंबाबत अनेक माहिती पुढे येत आहे. तसेच त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोपही केले जात आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबी (NCB) चे समीर वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला आहे. नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या बाहेर जो प्रकार सुरू आहे. त्याबाबत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं. दरम्यान आज समीर वानखेडे मुंबई कोर्टात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहून त्यांनी साक्ष दिली आहे. वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली आहे. काय म्हणाले वानखेडे...

समीर वानखेडेंची कोर्टापुढे साक्ष

समीर वानखेडेंची कोर्टापुढे साक्ष मला वैयक्तिकरित्या काही जणांकडनं लक्ष्य केलं जातंय. माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खाजगी फोट लिक करण्यात आलेत. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचा वागलेलो नाही. माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे. दरम्यान समीर वानखेडे आणि NCB चे दोन वेगवेगळे प्रतिज्ञापत्र केल्याचे समोर आले आहे, न्यायाधीश वैभव पाटील यांच्या विशेष एनडीपीएस कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं असून अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत असतानाच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे, असा इशारा समीर वानखेडे यांनी दिला होता.

त्याचा परिणाम या गुन्ह्याच्या तपासावर होऊ नये

गुन्हा क्रमांक 94/21 बाबत चर्चा सुरू असून गुन्ह्याबाबत समाज माध्यमावर सतत चर्चा सुरू आहे. अनेक पंचांची नाव उघड होत आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टाला माहिती देण्यात आली या गुन्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि ज्या काही तक्रारी होत आहेत, त्याचा परिणाम या गुन्ह्याच्या तपासावर होऊ नये , कारवाईवर होऊ नये, यासाठी एनसीबीचं पाऊल असल्याचं वानखेडेंनी सांगितले.

वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो व्हायरल...

कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणातून दररोज नवनवे खुलासे होत आहेत. एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शंका उपस्थित करत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी काही फोटोही समोर आणले आहेत. नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही म्हटलं की मलिक इतका विषय मांडतायत त्यातून दिसतंय की काहीतरी गडबड आहे.नवाब मलिक यांनी ट्विटरवर एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आहे. याला पहचान कौन असा कॅप्शन दिला आहे. हा फोटो एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच त्यांच्या पहिल्या लग्नातील हा फोटो असल्याचंही सांगण्यात येतंय. याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नसली तरी मलिक यांनी क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोचा पूर्ण फोटो व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: प्रशांत किशोर यांच्या 5 भविष्यवाणी; लोकसभा निकालाच्या किती जवळ जातील?

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट; DA नंतर आता वाढली ग्रॅच्युइटीची मर्यादा

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

ST History: लालपरी ते ई-शिवनेरी; कसा राहिलाय एसटीचा 76 वर्षांचा प्रवास? जाणून घ्या

June Travel Places : जूनमध्ये फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करताय? मग, थंड हवेच्या ‘या’ सर्वोत्तम ठिकाणांना द्या भेट

SCROLL FOR NEXT