Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: महायुतीत जुंपली; राष्ट्रवादी म्हणते, सत्तेत सहभागी होताना भाजपनं दिलं होतं आश्वासन; नेमकं काय प्रकरण?

Legislative Council Chairman Seat: विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आज किंवा उद्या नवा सभापती निवडला जाऊ शकतो. पण, या पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेंच सुरू झाली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- विधान परिषद सभापती पदावरुन महायुतीत जुंपल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून विधान परिषदेतील सभापती पद रिक्त आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आज किंवा उद्या नवा सभापती निवडला जाऊ शकतो. पण, या पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेंच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती पदावर दावा केला आहे. त्यामुळे पेच निर्माण होऊ शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सभापती पदासाठी इच्छुक आहे. सत्तेत सहभागी होताना विधान परिषद सभापती पद देण्याचं भाजपनं आश्वासन दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दूसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा देखील सभापती पदावर दावा आहे. त्यामुळे सभापती पदावरून महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गेल्या काही काळापासून विधान परिषदेचे सभापती पद रिक्त आहे. सध्या उपसभापती निलम गोऱ्हे विधान परिषदेचे कामकाज पाहात आहेत. विधानसभा निवडणुकीआधीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे त्यापूर्वी विधान परिषदेच्या सभापतीची निवड केली जाण्याची शक्यता आहे. सध्या या पदासाठी भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून निलम गोऱ्हे इच्छुक आहेत. त्यामुळे या पदासाठी कोणाला संधी मिळते हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, आज अधिवेशनातील कामकाजाचा आजचा महत्वाचा दिवस आहे. दोन्ही सभागृहांमध्ये काल आरक्षणाच्या चर्चेवरून गदारोळ झालं आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज संपवण्यात आलं होतं. मात्र आजपण आरक्षणाच्या विषयांवरून गदारोळ होणार का? हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. सोबतच काल या गोंधळात 94 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मान्य करण्यात आल्या, यावरून देखील आज विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT