NCP leader Ajit Pawar writes letter to CM Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: अजित पवारांचे CM शिंदेंना पत्र; काय म्हटलं आहे पत्रात?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्र लिहलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्र लिहलं आहे. त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पत्राद्वारे अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विशेष विनंती केली आहे. (NCP leader Ajit Pawar writes letter to CM Eknath hinde )

ज्येष्ठ नेते विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर, अजितदादांनी पावसाळी अधिवेशनात राज्यातील रस्त्यांच्या बाबतीत विषय मांडला होता. यापैकी, मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील विविध समस्यांबाबत त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहीले आहे.

काय म्हटलं आहे पत्रात?

पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून यामुळे मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर दररोज असा वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

रस्त्यांवरील खड्यांमुळे मणक्यांचे आजारांचे प्रमाण वाढले आहेत. वाहतुक कोंडीमुळे शहरातून प्रदूषणात भर पडत आहे. मुंबई नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत, असे अजित पवार यांनी नमूद केले आहे.

या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करणे, पुलांचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करणे, अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर मार्ग काढणे यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, वाहतूकदार संघटना, प्रवासी संघटना, स्थानिक नागरिक आदींना विश्वासात घेऊन वाहतुकीचे सुयोग्य आणि प्रभावी नियोजन करावे.

अनुषंगित उपाययोजना तात्काळ करणेबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात. शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करुन या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे, अशी विशेष विनंती अजित पवार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतापासून सर्वात दूरचा देश! जगातील सर्वात रहस्यमय बेट, अंटार्क्टिका अन् वाळवंट... 'या' देशाने भारतीयांना दिलं खास आमंत्रण

IND vs ENG 2nd T20: संजूचा पत्ता कट? दुसऱ्या टी-20 आधी वैभव सूर्यवंशीबाबत मोठी अपडेट! दुसऱ्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्गातील करूळ घाटात दरड कोसळली; महामार्गावरील वाहतूक ठप्प

Sting Ban: विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय! शाळांजवळ ५०० मीटरमध्ये स्टिंग पेय विक्रीवर बंदी, महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्देश

Shaktipeeth Expressway : शेतीच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ रद्द करा; उरुण-ईश्वरपूर पालिकेत सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी, बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर

SCROLL FOR NEXT