The unfortunate decision to ban dance bars: Chitra Wagh
The unfortunate decision to ban dance bars: Chitra Wagh 
महाराष्ट्र

डान्सबारवरील बंदी उठवणे हा दुर्भाग्यपूर्ण निर्णय : चित्रा वाघ

वृत्तसंस्था

मुंबई : राज्य सरकारने डान्स बारबाबत घातलेले अनेक नियम आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. तसेच राज्यातील डान्सबार पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा वाघ यांनी डान्सबारवरील बंदी उठवणे हा दुर्भाग्यपूर्ण निर्णय असल्याचे सांगितले. 

वाघ म्हणाल्या, तरुणाईला व्यसनाधिनतेपासून दूर ठेवण्यासाठी आर. आर. पाटील यांनी डान्सबारला बंदी घातली होती. 2005 साली कोट्यवधींचा महसूल मिळत असूनही डान्स बारवर बंदी आणली होती. मात्र, आता घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. हा समाजविघातक निर्णय आहे. सरकारची मानसिकता किती खंबीर आहे, यामधून दिसत आहे. आर. आर. आबांनी हजारो महिलांचे संसार त्यांनी वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला होता. न्यायालयाने टीप देण्यास परवानगी दिली. मात्र, पैसे उधळण्यास मनाई केली आहे.

दरम्यान, हा निर्णय समाजघातक आहे. यापूर्वी अनेक पिढ्यांचे नुकसान झाले. बारबालांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जातो. तसेच राज्यातील कोणत्याही महिलेला याबाबत विचारले, की हा निर्णय योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT