ncp leader Jayant Patil Citing the report directly targeted the Modi government knp94 
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: तुमचा दावा खोटा; अहवालाचा दाखला देत जयंत पाटलांचा थेट मोदी सरकारवर निशाणा

कार्तिक पुजारी

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकावर टीका केली आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इकोनॉमीच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा दाखला देवून त्यांनी मोदी सरकारचा दावा कसा खोटा आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.

एकीकडे देशात वेगवेगळ्या राज्यातील निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे, सत्ताधारी पक्षाचे नेते प्रचारात आकंठ बुडाले आहेत, दुसरीकडे मात्र भारतातील बेरोजगारी देखील शिगेला पोहचली असून देशातील युवा बेरोजगारीच्या नैराश्यात आकंठ बुडाला आहे, असं जयंत पाटील म्हणाले. (ncp leader Jayant Patil Citing the report directly targeted the Modi government)

सेंटर फॉर मॉनिटरींग इकोनॉमीच्या नुकत्याच प्रसिद्ध अहवालानुसार देशातील बेरोजगारीचा दर गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी म्हणजे १०.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

एकीकडे देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र बेरोजगारी देखील वाढत आहे. हे चित्र विरोधाभासी आहे. बेरोजगारी वाढत असल्याने देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचा केंद्र सरकार व भाजपा नेत्यांचा दावा सपशेल खोटा ठरत आहे, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT