Jitendra Awhad Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

आव्हाडांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती

सकाळ डिजिटल टीम

ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये केलेली मारहाण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना चांगलीत भोवली. काल आव्हाडांना वर्तक पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

आज सकाळी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मॉलप्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आता त्यांना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मॉलमध्ये राडा झाल्यानंतर काल त्यांना वर्तक पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आव्हाड यांच्या वकिलांनी पुन्हा एकदा जामीनाचा अर्ज केला होता. त्यानंतर आता 15 हजाराच्या जातमुचलक्यावर ठाणे कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. इतर 10 कार्यकर्त्यांचाही जामीन मंजूर झाला आहे. ठाणे कोर्टाच्या समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

SCROLL FOR NEXT