Jitendra Awhad Sakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad : मी तुकडे टाकल्यावर राजकीय कुत्रे भू भू करतात - कालिचरण महाराज

धर्म आणि देशासाठी काम करताना आम्ही कोणत्याही स्तरावर जायला तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

वैष्णवी कारंजकर

कालिचरण महाराज यांनी नुकतंच महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानावरुन वातावरण तापलेलं आहे. त्यातच आता आणखी एका विधानाची भर पडली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता कालिचरण महाराजांनी निशाणा साधला आहे.

मी तुकडे टाकल्यावर राजकीय कुत्रे भू भू करतात, असं विधान करत त्यांनी आव्हाडांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

कालिचरण महाराजांनी काही दिवसांपूर्वीच महात्मा गांधी यांच्या हत्येच्या समर्थनार्थ विधान केलं होतं. नथुराम गोडसेने महात्मा गांधींबाबत जे केलं ते अगदी योग्य केलं. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता, गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम. नथुराम गोडसेंना तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुम्ही त्यांचे भक्त व्हाल, असं विधान कालिचरण महाराजांनी केलं होतं.

त्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. कालिचरणची लायकी काय? त्याचं शिक्षण काय? नथुराम गोडसे देशातला पहिला अतिरेकी आहे. महात्मा गांधींबद्दल बोलणारा कालिचरण कोण? असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतानाच कालिचरण महाराजांनी ही टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT