NCP mla mansingh naik attended meeting sharad pawar NCP Crisis ajit pawar group marathi political news  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : राजकीय वारे फिरणार? अजितदादांना समर्थन देणाऱ्या आमदाराची शरद पवारांचे बैठकीला हजेरी

यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, यानंतर पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी पक्षात अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी फूट पडली. यादरम्यान दोन्ही गटांमध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळत आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर दोन्ही गट पक्षाच्या विस्तारासाठी राज्यभर सभा घेताना दिसत आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी देखील सुरू आहे. यादरम्यान शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंह नाईक शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याचे समोर आले .

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती, या बैठकीत लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा या बैठकीत घेतला गेला. या बैठकीला पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याचा बैठकीला नाईक देखील उपस्थित होते.

दरम्यान शरद पवारांच्या बैठकीतून बाहेर पडल्यावर आमदार मानसिंग नाईकांचा माध्यमांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. तसेच माध्यमांच्या प्रश्नावर मानसिंग नाईक चिडले देखील. मी चारवेळा सांगितलं आहे, ही काय पद्धत आहे… असं म्हणत प्रतिक्रिया देण्यास त्यानी नकार दिला.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि शिराळा मतदार संघाचे आमदार मानसिंह नाईक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिले होतं. यानंतर आता ते शरद पवारांच्या बैठकीसाठी आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे अजित पवारांची साथ सोडून ते शरद पवारांच्या पाठिशी उभे राहणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महत्वाचे म्हणजे अद्यापही राष्ट्रवादीचे अनेक आमदार नेमके कुणासोबत आहेत, हे स्पष्ट नाहीये. त्यामुळे मानसिंग नाईक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरात शाळा महाविद्यालयाना सुट्टी जाहीर; उद्या ऑरेंज सिटीला ऑरेंज अलर्ट; दिवसभरात १७९ मिमी पाऊस

Sanju Samson: विराट कोहलीचा सल्ला मानला, पण जेमतेम दीड वर्षच पाळता आला; संजू सॅमसनने सांगितला खास किस्सा, नेमक काय म्हणाला संजू?

Latest Live Updates Marathi : नागपुरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका, सोनेगाव पोलीस स्टेशन पाण्याखाली

Pune Stray Dog Census : पुण्यात भटक्या श्वानांची नव्याने गणना; जुनी हद्द व समाविष्ट ३२ गावांतील संख्येचा एका वर्षात ताळेबंद

महाभारतातील महान योद्ध्याची अनोखी गाथा; अॅनिमेटेड सिरीजमधून उलगडणार कर्णाचा महासंग्राम!

SCROLL FOR NEXT