Sanjay Shirsat vs Rohit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : मी मंत्रीपदासाठी लाचार झालो नाही आणि नियत कुठं विकलेली नाही; रोहित पवारांची शिरसाटांवर सडकून टीका

'आम्ही कुठेही पदासाठी, मंत्रीपदासाठी लाचार झालेलो नाही, आम्ही नियत कुठे विकलेली नाही.'

हेमंत पवार

आम्ही पदांसाठी कोठेही भेदभाव करत नाही. परंतु मला पद नको, विचार महत्त्वाचा आहे.

कऱ्हाड : संजय शिरसाट स्वतः प्रवक्ते असल्यामुळं त्यांच्या पोटात कुठंतरी दुखतंय. त्यांना मंत्री व्हायचं आहे, ते स्वतः बोललेले आहेत. आम्ही कुठेही पदासाठी, मंत्रीपदासाठी लाचार झालेलो नाही, आम्ही नियत कुठे विकलेली नाही. तेव्हा तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका, असा टोला आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे नेते शिरसाट यांना लगावला.

आमदार रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी कऱ्हाड (जि. सातारा) येथे काहीकाळ थांबून माध्यमांशी संवाद साधला. माजी नगरसेवक सौरभ पाटील, समीर कुडची, संजय पिसाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, पवार कुटुंबातील व्यक्तीला संधी मिळाल्यानंतर अध्यक्ष व्हायचं असतं तर मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो असतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये मी मंत्री होऊ शकलो असतो. पण, मी झालो का? मला मंत्री कुठे व्हायचं असतं, पदासाठी मी लढत असतो तर मी आज सत्तेच्या बाजूला असतो.

आम्ही पदांसाठी कोठेही भेदभाव करत नाही. परंतु मला पद नको, विचार महत्त्वाचा आहे. संजय शिरसाट स्वतः प्रवक्ते असल्यामुळं त्यांच्या पोटात कुठंतरी दुखतंय. त्यांना मंत्री व्हायचं आहे, ते स्वतः बोललेले आहेत. आम्ही कुठेही पदासाठी, मंत्रीपदासाठी लाचार झालेलो नाही, आम्ही नियत कुठे विकलेली नाही. तेव्हा तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका, असा टोलाही त्यांनी लगावला.

'भरतीतील काळ्याबाजाराविरोधात रस्त्यावर उतरू'

सध्या सुरू असलेल्या भरतीमध्ये काळाबाजार सुरू आहे. सरकार मुद्दामहून खासगी कंपन्यांकडून भरती करत आहे. पेपर अनेक वेळा फुटलेले आहेत. त्यामध्ये एफआयआर दाखल होवूनही सरकार उलट पेपर कुठे फुटला आहे असे म्हणत असेल, तर कुठेतरी चुकीचं घडतंय आणि त्याची पाठराखण सरकार करतंय. पुढच्या काही दिवसांत यामध्ये सुधारणा न झाल्यास शिक्षक भरती, प्राध्यापक भरतीत जो काही काळाबाजार चालला आहे. या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

SCROLL FOR NEXT