ncp mp supriya sule husband sadanand sule tweet on abdul sattar remark  
महाराष्ट्र बातम्या

Sattar Controversy: सुप्रिया सुळेंना पती सदानंद सुळेंचा पाठिंबा; सत्तारांच्या विधानावरुन व्यक्त केल्या भावना

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शिंदे गाटाचे नेते अब्दुल सत्तार हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात, आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने नवा वाद पेटला आहे. सत्तार यांनी कॅमेऱ्यासमोर सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अनेक ठिकाणी जोडे मारो आंदोलन करत सत्तारांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला जात आहे.

यादरम्यान सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, त्यांच्या ट्विटर हँडलवरूनही एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून यासोबत त्यांनी लिहीले आहे की, “या महिलाविरोधी नेत्यांकडून सुप्रियाबद्दल आणि पर्यायाने सर्व महिलांबद्दल वादग्रस्त विधाने सुरुच आहेत. पुरुषार्थ सांगणारे हे लोक त्यांच्या वर्तवणुकीमुळे उघडे पडले आहेत,”

"या आधी 'स्वयंपाकघरात जाऊन काम कर' हे विधान असो किंवा विद्यमान मंत्र्याचे सध्याचे विधान. हे असे लोक आहेत जे आमदार आणि 'नव्या' पुरोगामी सरकारचा भाग असल्याचा दावा करतात.." असे सदानंद सुळे यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, "...ते स्वत: शिवाय कोणाचीही पर्वा करत नाहीत, महिलांची तर नाहीच. सुप्रिया हे चांगले काम करत राहा, तुला आणि इतर महिलांना ही मानसिकता आणि 'निवडलेल्या' लोकप्रतिनिधींचे खरे चारित्र्य उघडकीस आणण्याची शक्ती मिळो!"

अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांनी खोके देण्याची ऑफर केली होती, यावर बोलताना सुप्रिया सुळे या तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असे म्हटले होते. यावर प्रश्न विचारला असता सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं. त्यांच्या या विधानानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

रिक्षातून प्रवास करणाऱ्या आजीबाईला लुटणाऱ्या चौघी जेरबंद! बुडालेल्या समर्थ बॅंकेच्या लॉकरमधून पैसे घेऊन जात होत्या घरी, वाढदिवसाच्या दिवशीच चोरी

MLA Rahul Awade : पंचगंगा नदी गाळमुक्त करणार; जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सकारात्मक चर्चा

SCROLL FOR NEXT