Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांचा आजचा सोलापूर, माढा दौरा अचानक रद्द, कारण....

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आजचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आजचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे.

इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत. सकल मराठा समाजाने दौर्‍याला विरोध केला आहे. जिल्ह्यात येण्यापूर्वी आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान शरद पवार हे पंढरपूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती जाणून घेणार होते. त्यासाठी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवले होते.

या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. शिवाय पंढरपूर शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी शरद पवारांच्या स्वागताचे ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते, मात्र हा आजचा दौरा रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या माढा दौऱ्याची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती. आजच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी देखील आयोजकांकडून पुर्ण करण्यात आली होती. मात्र शरद पवारांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT