Jaynat Patil and Ajit pawar  
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : अजित पवारांकडून मिळाला सर्वाधिक निधी? जयंत पाटील स्पष्टच बोलले...

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला मोठी फूट पडली. या फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. दुसरीकडे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून आमदार जयंत पाटील सर्वाधिक निधी दिल्याची चर्चा समोर आली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षात दोन गट तयार झाले. अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. यामध्ये अजित पवार गट सत्तेत सामील झाला असून अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याची धुरा सोपविण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांनी अर्थखात्याचा भार घेतल्यापासून आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीची चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांनी आमदारांना मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप केले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अजित पवार यांच्याकडून भरघोस निधी देण्यात आला आहे. सत्तेतील शिवसेना आणि भाजप आमदारांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अधिक निधी भेटला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांमध्ये जयंत पाटील यांना सर्वाधिक ५८० कोटी निधी देण्यात आल्याचा दावा काही माध्यमांमधून करण्यात आला होता.

दरम्यान जयंत पाटील यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. ५८० कोटी रुपये निधी मिळाला हे खरं नाही. केवळ २० ते २२ कोटी रुपये निधी मिळाल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. केवळ गैरसमज पसरविण्यात येत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT