vidya chavan esakal
महाराष्ट्र बातम्या

Video: पेन ड्राईव्ह बॉम्ब! ''चित्रा वाघचे कारनामे...'' विद्या चव्हाणांचा इशारा; उद्या ३ वाजता पत्रकार परिषद

Vidhya Chavan: ''चित्रा वाघ ह्या खोटारडेपणा करत आहेत, पदासाठी त्या काहीही करु शकतात. माझ्याकडे असलेल्या या पेन ड्राईव्हमध्ये सगळं आहे.. काय बोलतात काय करतात. उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघचे कारनामे बाहेर काढून महाराष्ट्रासमोर त्यांचं खरं रुप आणणार आहे.''

सकाळ डिजिटल टीम

Chitra Wagh: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे. चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्याकडे पेन ड्राईव्हमध्ये असून आपण ते उघड करणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. पेन ड्राईव्ह उंचावून दाखवत चव्हाण यांनी पुरावे असल्याचं म्हटलंय.

विद्या चव्हाण यांनी एक व्हिडीओ जारी केला असून त्याद्वारे त्यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला. व्हिडीओमध्ये विद्या चव्हाण म्हणताएत की, शरद पवार यांना आधी पितृतुल्य म्हणणाऱ्या चित्रा वाघ आता त्यांना शरद अली म्हणत आहेत.. महाराष्ट्राला बजेटमध्ये भरभरुन दिलं, अशा थापा मारत आहेत.. खोटं नरेटिव्ह सेट केल्याचं म्हणाएत. पत्रकार, समाजसेवक आणि लाखोंचे मोर्चे काढणाऱ्यांना पोपट म्हणून हिणवत आहेत.

चव्हाण पुढे म्हणाल्या की, चित्रा वाघ ह्या खोटारडेपणा करत आहेत, पदासाठी त्या काहीही करु शकतात. माझ्याकडे असलेल्या या पेन ड्राईव्हमध्ये सगळं आहे.. काय बोलतात काय करतात. उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघचे कारनामे बाहेर काढून महाराष्ट्रासमोर त्यांचं खरं रुप आणणार आहे.

दरम्यान, मंगळवारी दुपारी ३ वाजता विद्या चव्हाण राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे? हे उद्या उघड होणार आहे. चित्रा वाघ कुणाबद्दल काय काय बोलतात, याची माहिती पेन ड्राईव्हमध्ये असल्याचं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT